RERA सारख्या कायद्याची गरज का निर्माण झाली?

RERA म्हणजे काय हे सांगण्या आधी RERA हा कायद्याची का आवशयकता निर्माण झाली ह्या बद्द्दल थोडेसे सांगणे आवश्यक आहे .

RERA सारख्या कायद्याची गरज का निर्माण झाली ?

RERA म्हणजे काय हे सांगण्या आधी RERA हा कायद्याची का आवशयकता निर्माण झाली ह्या बद्द्दल थोडेसे सांगणे आवश्यक आहे .

पूर्वी आपण घर खरेदी करताना आपल्या गरजा व आपले बजेट किती आहे ह्याचा विचार करून परवडणारे घर बघत असू . आपल्याला हव्या हव्यश्य गोष्टी पूर्ण होत आहेत म्हणल्यावर बिल्डर कडून त्याठिकाणी फ्लॅट बुक करायचे ठरवत असू . बिल्डर पण ग्राहकाला खूष करण्यासाठी BROUCHER मध्ये त्याच्या प्रोजेक्टमध्ये काय काय सुविधा आहेत ह्या बद्दल काही माहिती देत असे . ग्राहक पण त्याला हुरळुन जात असत आणि घर बुक करून कधी एकदा आपण स्वतःच्या घरात राहायला जाऊ असे होत असे त्यामुळे सर्व पैश्याची आर्थिक जुळवाजुळावं करून फ्लॅट बुक केला जाई . बिल्डर पण ग्राहक आला आहे म्हणल्यावर फ्लॅट बुक करून एक विशिष्ठ तारखेला फ्लॅट देऊ असे सांगत असे परंतु प्रत्यक्षात तसे काही होत नसे .
ग्राहक पण घराचा ताबा कधी मिळेल याकडे वाट बघत असे .काही दिवसांनी तो कंटाळून ग्राहक मंच मध्ये बिल्डर विरुद्ध लेखी तक्रार देई पण त्याचाही फारसा उपयोग होईना .तारीख पे तारीख ,परत राहायच्या खर्च परी खर्च , मानसिक त्रास सहन करणे हया गोष्टी होऊ लागले . त्याच प्रमाणे काळानुसार परिस्तिथी बदलल्यामुळे व आर्थिक धोरण बदलत गेल्या मुळे स्वतःचे हक्काचे घर घेण्याकडे जास्त लोक वळले .
बिल्डर लॉबी खूपच मनमानी करत कित्येक लोकांना घरे मिळायला वेळ लागू लागला .ह्याने लोक इतके त्रासले कि सरकारला ह्यची नोंद घ्यावीच लागली . दिल्ली येथील काही कोटींचे गैरव्हवहार याने त्यातभर घातली आणि शेवटी सरकारला ह्याची दाखल घेत १५ मार्च २०१६ रोजी संपूर्ण देशात हा कायदा अमलात आणण्यात आला.
28 राज्यांतील (हा कायदा जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू नाही)जेथे कायदा लागू केला जातो, फक्त तीन राज्यांनी ने एका नियमकाची नियुक्ती केली आहे. १४ राज्यांनी स्वतःची संकेतस्थळ काढली आहेत. हा कायदा बनूनआता जवळजवळ एक ववर्षा पेक्षा जास्त वेळ जहाला आहे आणि आता संपूर्ण ९२ सेकशन्स लागू जहाले आहेत .
महाराष्ट्र ,गुजराथ ,मध्यप्रदेश ,केरळ ,आंध्रप्रदेश ,उत्तरप्रदेश,बिहार ,पंजाब अँड दिल्ली यांच्यात MahaRERA सर्वात अग्रगण्य आहे. रेरा हा कायदा असून त्याची पोहोच व व्याप्ती खूप मोठी आहे .सर्वसामान्यांच्या साठी बनलेला हा कायदा संपूर्ण भारतातील बांधकाम व्यवसायात आमूलाग्र बदल घडवून आणेल यात काहीही शंका नाही . अधिकाधिक राज्य ह्याचा सखोल अभ्यास करून हा कायदा अमलात आणतील आणि हे नवीन भारत निर्माणातील एक अत्यंत महत्वाचा मैलाचा दगड ठरेल.

लोकांना आपल्या बुक केलेल्या फ्लॅट ची घर बसल्या update व महिती मिळण्याच्या उद्देशाने उंबर घर ह्या सॉफ्टवेअरची निर्मिती झ्हाली आहे .उंबर घर हे देखील एकमेव software आहे जे रेरा साठीच बनवले आहे . अधीक माहीती साठी umberghar संकेत स्थळी भेट ज्ञा.

शेवटी असे म्हणता येईल कि हे नवीन #RERAERA तर नाहीना !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *